ग्रामपंचायत वेबसाइट धोरणे
विभागाचे नाव
ग्रामपंचायत प्रशासन विभाग
संकेतस्थळाचा उद्देश
ही संकेतस्थळ गावातील प्रत्येक गावकऱ्यांपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचविण्यासाठी आणि गावाच्या विकासाशी संबंधित घडामोडी नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश म्हणजे गावातील महत्त्वाच्या सभा, दवंडी कार्यक्रम, सूचना आणि प्रशासकीय माहिती गावकऱ्यांपर्यंत वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचवणे.
हे संकेतस्थळ एक फोरम म्हणून तयार करण्यात आले असून, गावकरी या माध्यमातून आपल्या गावाच्या विकासासंबंधी माहिती घेऊ शकतात तसेच गावाच्या हितासाठी एकमेकांशी संवाद साधू शकतात. येथे प्रत्येक गावकऱ्याला आपल्या गावाच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग घेण्याची संधी मिळेल.
वेबसाईटचा उपयोग:
- महत्त्वाच्या सभा: ग्रामपंचायतीच्या महत्त्वाच्या सभांची माहिती, वेळ, ठिकाण आणि अजेंडा गावकऱ्यांना वेळेवर कळवणे.
- दवंडी कार्यक्रम: गावातील दवंडी कार्यक्रमांची माहिती, जसे की आरोग्य शिबिरे, सरकारी योजना, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी गावकऱ्यांना देणे.
- सूचना: गावातील महत्त्वाच्या सूचना, जसे की पाणीपुरवठा, वीजपुरवठा, रस्ते दुरुस्ती, आपत्कालीन सूचना इत्यादी गावकऱ्यांना देणे.
- ग्रामपंचायत योजना: गावकऱ्यांसाठी असलेल्या ग्रामपंचायत योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे गावकऱ्यांना देणे.
- संपर्क माहिती: ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची संपर्क माहिती गावकऱ्यांना देणे.
- गावातील घडामोडी: गावातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती, जसे की विकासकामे, सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव इत्यादी गावकऱ्यांना देणे.
- तक्रार निवारण: गावकऱ्यांच्या तक्रारी आणि समस्या नोंदवण्यासाठी आणि त्याचे निवारण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
कायदेशीर जबाबदारीचे स्पष्टीकरण
ही संकेतस्थळ ग्रामपंचायत प्रशासन विभागासाठी विकसित करण्यात आले असून, एका बाह्य स्वतंत्र वेब डेव्हलपर कडून हे संकेतस्थळ तयार करून घेण्यात आले आहे. संकेतस्थळ विकसित करताना त्यांनी GIGW आणि NIC च्या मार्गदर्शक तत्त्वांचा शक्य होइल तेवढा अभ्यास केला आहे आणि शक्य तितक्या प्रमाणात त्या तत्त्वांचे पालन करण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, संकेतस्थळ .gov.in डोमेनवर नसून ग्रामपंचायतीने .in डोमेन निवडले आहे व .in डोमेनवर कार्यरत आहे आणि स्वतंत्र सर्व्हरवर होस्ट केले आहे.
ही संकेतस्थळ ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार विकसित करण्यात आली असून, या संकेतस्थळावरील सर्व माहिती ग्रामपंचायत प्रशासनाच्या निर्देशांनुसार अपडेट केली जाते. त्यामुळे या संकेतस्थळाच्या सामग्रीसंदर्भात कोणत्याही कायदेशीर बाबींसाठी वेब डेव्हलपर जबाबदार असणार नाही.
वापरण्याच्या अटी
ही संकेतस्थळाची माहिती ग्रामपंचायत प्रशासन विभागाद्वारे प्रकाशित आणि व्यवस्थापित केली जाते. संकेतस्थळावरील माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, परंतु ही माहिती केवळ सामान्य माहिती म्हणून उपलब्ध करून दिली जाते आणि कायदेशीर पुरावा म्हणून वापरता येणार नाही.
संकेतस्थळाचा वापर करताना कोणत्याही प्रकारच्या नुकसान, खर्च किंवा हानीसाठी ग्रामपंचायत प्रशासन विभाग जबाबदार राहणार नाही. तसेच, संकेतस्थळावर दिलेल्या इतर संकेतस्थळांच्या लिंक्स फक्त नागरिकांच्या सोयीसाठी दिल्या आहेत, आणि त्यांच्या उपलब्धतेबाबत आम्ही हमी देत नाही.
भारतीय कायद्याच्या अधीन राहून या अटी व नियमांचे पालन केले जाईल आणि कोणताही कायदेशीर वाद स्थानिक न्यायालयाच्या क्षेत्राधिकारात राहील.
कॉपीराइट धोरण
ग्रामपंचायत संकेतस्थळावरील माहिती विनामूल्य पुनरुत्पादित केली जाऊ शकते, परंतु त्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. माहिती जशीच्या तशी पुनरुत्पादित करणे बंधनकारक आहे आणि ती दिशाभूल करणारी किंवा अप्रतिष्ठाकारक स्वरूपात वापरली जाऊ नये.
कोणत्याही माहितीचे पुनरुत्पादन करताना मूळ स्रोत अभिस्वीकृत करणे आवश्यक आहे. तथापि, संकेतस्थळावर काही अशी माहिती असू शकते जी इतर तृतीय पक्षाच्या सर्वाधिकाराच्या अंतर्गत येते. अशा माहितीच्या पुनरुत्पादनासाठी संबंधित विभाग अथवा सर्वाधिकार धारकांकडून परवानगी घ्यावी लागेल.
गोपनीयता धोरण
संकेतस्थळ कोणत्याही वैयक्तिक माहितीचा संग्रह करत नाही, जोपर्यंत तुम्ही ती स्वतःहून प्रदान करत नाही. जर तुम्ही संकेतस्थळाद्वारे वैयक्तिक माहिती दिली असेल, तर ती केवळ निर्दिष्ट उद्देशांसाठीच वापरण्यात येईल आणि गोपनीयता राखली जाईल.
तुमच्या भेटीची माहिती जसे की आय. पी. अॅड्रेस, ब्राउजर प्रकार, भेट दिलेल्या पृष्ठांची नोंद, तारीख आणि वेळ या तांत्रिक बाबींचा वापर वेबसाइटच्या सुरक्षिततेसाठी आणि सुधारण्यासाठी केला जातो. कोणतीही माहिती तृतीय पक्षासोबत विक्री अथवा शेअर केली जाणार नाही.
हायपर लिंकिंग धोरण
बाह्य संकेतस्थळांचे दुवे
ग्रामपंचायत संकेतस्थळावर इतर शासकीय किंवा संबंधित संस्थांच्या संकेतस्थळांचे दुवे दिले जाऊ शकतात. हे दुवे फक्त नागरिकांच्या माहितीसाठी दिले जातात आणि त्यांच्या कार्यक्षमतेसाठी किंवा माहितीच्या अचूकतेसाठी ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही.